रोज नवं गावं नवे मुक्कामाचे ठिकाण हे वेगवेगळे अनुभव देणारं असायचं पण त्यात सुध्दा पहाटे घाटावर पूजा केली की आजूबाजूची नवीन तरीही महत्वाची देवळं म्हणजे आनंदनिधान असायचं!! कितीतरी ठिकाणी गुरुंकडून, पुजार्यांकडून,गाईड कडून त्या मंदिराविषयी आख्यायिका, कहाण्या ऐकायला मिळायच्या.
बोटीच्या प्रवासानंतर मिठीतलाई पोचलो आणि तिथून मुक्कामाला गरूडेश्र्वरला पोचलो. गरुडेश्र्वराला दत्तमंदिर आहे.या मंदिरात त्रिमूर्ती दत्ताची संगमरवरी मूर्ती आहे गाभाऱ्यात दत्त मुर्ती शेजारी उजव्या हाताला शंकराचार्यांची तर डाव्या हाताला सरस्वतीची बैठी मूर्ती आहे. गाभाऱ्याबाहेर मध्यभागी वासुदेवानंद सरस्वतींची बैठक घातलेली मूर्ती आहे. आणि त्या मुर्ती पूढे त्यांच्या पादूका आहेत. मैयेला जाताना थोड्या पायऱ्या उतरल्यावर प.पू.वासूदेवानंद सरस्वती ह्यांची समाधी आहे.परिक्रमेतलं एक काहीतरी अनुभुती देणारं हे मंदिर आहे.
शेठाणी घाट
संपूर्ण परिक्रमेतला मोठा आणि रेखीव घाट!! पूर्वी नर्मदापूर नांव असलेल्या हौशिंगाबादला हा घाट आहे.संध्याकाळी हौशिंगाबादला पोचल्यावर आम्ही सर्वजण घाटावर गेलो संध्याकाळच्या वेळी बर्याच जणांनी नर्मदेत दिवे सोडले होते. त्या मोठ्या घाटावर त्या दिव्यांनी घाटाचं सौंदर्य वाढत होते. घाटाजवळ जगन्नाथाचं मंदिर आहे तिथंच सत्संगभुवन आहे.ज्याचा अनेक भाविक, परिक्रमावासी अनुभव घेतात. घाटाजवळ श्री हनुमान, नर्मदामाता, भगवान शंकर श्री शनिदेव अशी अनेक देखणी मंदिरे आहेत.
कोणत्याही घाटावर उभ राह्यलं की मनात यायचं "नमामि देवी नर्मदे"
आता आपल्या बरोबर असलेल्या सहप्रवाशांची थोडक्यात ओळख... ह्यावेळी जोडीनं आलेल्या मंडळींचा परिचय देणार आहे.
ज्योती दोंदे आणि दिलीप दोंदे रहायला ठाण्याला पण सध्या लेकी कडे ओमानला गेले आहेत.
दिलीपकाका ग्लैक्सो आणि एससीआय मध्ये रिसर्च आणि international marketing विभागाध्यक्ष होते. मॅनेजमेंट institution मध्ये visiting faculty होते.सध्या इंटरनॅशनल विक्री सल्लागार आहेत.मंडळी बघा आपल्या बरोबर किती मोठी व्यक्ती होती. आणि खरं सांगायचं तर मला वाटतं त्यांनी परिक्रमा काकूंसाठी केली अनेक ठिकाणी ते चढू उतरू शकत नसल्याने ते वरती बसून रहायचे सहजीवनाचे सुंदर उदाहरण!! आणि काकू सुध्दा आर्.बी.आय एक्सेंज कंट्रोल तसेच इतर विभागात काम करून निवृत्त झाल्या आहेत. काकूंची आवड म्हणजे गाणी ऐकणं!!
आपलं दुसरं दांपत्य म्हणजे प्रशांत श्रोत्री आणि विदूला श्रोत्री!! दोघही दिसायला इतके तरूण की आम्हा सर्वांच्या मनात आलं की घर, मुलं सोडून ही दोघं कसे आले असतील? पण प्रशांत स्टॉक होल्डिंग्स काॅरपरेशन मधून निवृत्त आणि विदूला रेल्वेतून निवृत्त!! आहे की नाही गंमत! प्रशांतला जुनी गाणी ऐकायला, वाचायला आणि प्रवास करायला आवडतं. विदूला यू ट्यूब वरच्या रेसिपी बघून मस्त नवनवीन प्रयोग करून खायला घालते असं प्रशांत नी खास लिहलंय!! त्यांच्या एका मुलीचं लग्न झालं आहे आणि दुसरी फिजिओथेरपी पदवी शिक्षण घेतेय. ह्या दोघांची स्पेशालिटी म्हणजे त्यांचा नंबर असायचा पण तो शेवटचा ह्याला उशीरा येणं असं मी नाही म्हणणार. मला वाटतं ह्या विनोदाचा त्यांना राग नाही येणार.
आपली चौथी जोडी दोघीजणींची आहे. दोघी BSNL मधून रिटायर्ड झाल्या आहेत. आणि मैत्रीणी आहेत त्यामुळे सतत एकत्र होत्या.... पहिले आहेत जया गणाचारी आणि रमाकांत गणाचारी! रमाकांत MTNL मधून निवृत्त झाले आहेत.त्यांच्या मुलाचा स्वतःचा व्यवसाय आहे. हे रहातात सी वुड नवी मुंबईला!! ह्यांना पर्यटनाची आवड आहे आणि त्याच मुख्य कारण माणसं भेटणं त्यांच्याशी मैत्री होणं असं जयाताईंनी खास सांगितलं. मला जेव्हा जेव्हा चढा उतरायला गरज असायची तेव्हा जयाताईंचा हात नेहमी पूढे असायचा.
दुसऱ्या म्हणजे सुमेधा दिक्षित आणि सुधीर दिक्षित. ते नव्या पनवेलला रहातात.सुधीरजी BOSCH मधून निवृत्त झाले आहेत आणि सध्या MNC येथे consultant म्हणून काम करत आहेत. सुमेधाताईंनी आवर्जून आपल्या गृपचा मांडवगडचा फोटो पाठवलाय. जो मी ब्लॉगवर टाकलाय. फोटो बघून सर्वांच्या आठवणी जाग्या होतील.
आणि आता शेवटची जोडी म्हणजे रमेश दळवी आणि रेणूका दळवी. तेनवी मुंबई नेरूळला रहातात. दोघंही आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर असले तरी दोघांचं एकमेकांकडे सतत लक्ष असायचं. रमेशजी रक्षा लेखा विभागातून निवृत्त झाले आहेत. त्यांना जूनी गाणी ऐकायला खूप आवडतं. आणि खूप महत्त्वाचं म्हणजे दुसर्यांना मदत करायला आवडतं... असं वाटणं किती महत्त्वाचं आहे!! त्यांनी रेणूका स्वैपाक खूप छान करते असं खास लिहीलय.नवर्यानी असं कौतुक केलं की छान वाटतं ना मंडळी!! सध्या ती दोघं पोर्ट ब्लेअरला फिरायला गेली आहेत.
तर असे आपले सहप्रवासी त्यातसुद्धा वर्षा-अनिल दळवी, लीना-इन्द्रजीत डहाळे,शैला- गणेश शिंदे, श्री व सौ पानसरे ह्यांचा उल्लेख सुरवातीलाच केला आहे.
सर्वांना महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
ललिता छेडा